माझं प्रेम मनं जोडणार् नातं होतं, नात्यातील विश्वासाच्या पलिकड़च् होतं, मिञां मधील मैञीच् प्रतीक होतं, जीवनात अनुभवलेल सूख होतं, कोणतीही अपेक्षा न ठेवता, माझ प्रेमावरं ही प्रेम होतं, पण शेवटी माझं प्रेम माती होतं, पण मनापासून केलं होतं...! माझं प्रेम भरं उन्हात तापलेल्या रसत्या सारखं होतं, पायाला अलगद चटके देणारं होतं, थकलेल्या वाटसरूला सावली देणारं होतं, भरं उन्हात ही थंड गारवा देणारं होतं, शेवटी भाजलेल्या पायावर फुंकर देणारं होतं, माझं प्रेम माती होतं, पण मनापासून केलं होतं...! माझं प्रेम मातीतून वर डोकावनार इवलसं रोपट् होतं, त्याला घातलेल खत-पाणी होतं, वेलीवर फूलणार फूल होतं, फूलासारखं चेहर्यावर खूलणार हसू होतं, शेवटी फूल्लेल फूल ही कोमजून मातीत पड़ल होतं, माझं प्रेम माती होतं, पण मनापासून केलं होतं...! माझं प्रेम मातीला ही प्रेमान आकार देणारं होतं, हातांनी घडवलेलं मातीच् मडक् होतं, त्या मडक्यातलं थंड पाणी होतं, मडक्यातून बाहेर पाझरनारं पाझर होतं, शेवटी फूटलेल्या मडक्याच् खापर होतं, माझं प्रेम माती होतं, पण मनापासून केलं होतं...! माझं प्रेम तिच् हस्न बघुन चेहर्यावरच् हसु होतं, तिच्या ...
Comments
Post a Comment