प्रेम करावं...!
प्रेमाचं नात अनमोल असावं,
प्रेम हे आपलसं असावं,
म्हणून आपण प्रेम करावं...!
आपण विनोद करावं अन् तिनं हसावं,
ती दुखात असेल तर आपण रडावं,
तरी आपण प्रेम करावं...!
कोणी तरी सोबत असावं,
आपल्याला मिठीत घ्यावं,
म्हणून आपण प्रेम करावं...!
तिनं आपल्या सोबत भांडावं,
आपली चूक नसेल तरी आपणच् सॉरी म्हणावं,
तरी आपण प्रेम करावं...!
दोघांनी मिळून एकच स्वप्न रंगवावं,
अन् त्या स्वप्नातल्या घरात आपल्याला राहता यावं,
म्हणून आपण प्रेम करावं...!
तिचि साथ असावी आपलं नातं टिकावं,
पण अस जमवत्तानां कधी आपलच् मोडावं,
तरी आपण प्रेम करावं...!
तिचा हाथ धरुन गर्दीत चालावं,
कोणाचा धक्का लागू नये म्हणून जवळ करावं,
तिचि काळजी करता यावी
म्हणून आपण प्रेम करावं...!
मनातली भावना तिला कधी न् सागांवं,
का
तर ती आपली होणार नही हे माहीत असावं,
तरी आपण प्रेम करावं...!
मंदिरात जावं अन् फुल चढवावं,
तिला फुलासारखं जप बस् एवढच् मागांवंं,
ती आपल्याला मिळावी
म्हणून आपण प्रेम करावं...!
आपल् स्वप्न एका क्षणात मोडावं,
अन् हसर्या चेहर्यान आपण जगा समोर रडावं,
तरी आपण प्रेम करावं...!
इच्छा असेल कि खरं प्रेम कळावं,
तरंच आपण प्रेम करावं...!
- प्रदीप साबळे
Read more Shayari: Best of Shayari
2 Line Shayari
Dard Shayari
Birthday Shayari
Motivational Shayari
Read more Marathi Poems: प्रेम करावं...!
Comments
Post a Comment