Posts

माझं प्रेम...!

माझं प्रेम मनं जोडणार् नातं होतं, नात्यातील विश्वासाच्या पलिकड़च् होतं, मिञां मधील मैञीच् प्रतीक होतं, जीवनात अनुभवलेल सूख होतं, कोणतीही अपेक्षा न ठेवता, माझ प्रेमावरं ही प्रेम होतं, पण शेवटी माझं प्रेम माती होतं, पण मनापासून केलं होतं...! माझं प्रेम भरं उन्हात तापलेल्या रसत्या सारखं होतं, पायाला अलगद चटके देणारं होतं, थकलेल्या वाटसरूला सावली देणारं होतं, भरं उन्हात ही थंड गारवा देणारं होतं, शेवटी भाजलेल्या पायावर फुंकर देणारं होतं, माझं प्रेम माती होतं, पण मनापासून केलं होतं...! माझं प्रेम मातीतून वर डोकावनार इवलसं रोपट् होतं, त्याला घातलेल खत-पाणी होतं, वेलीवर फूलणार फूल होतं, फूलासारखं चेहर्यावर खूलणार हसू होतं, शेवटी फूल्लेल फूल ही कोमजून मातीत पड़ल होतं, माझं प्रेम माती होतं, पण मनापासून केलं होतं...! माझं प्रेम मातीला ही प्रेमान आकार देणारं होतं, हातांनी घडवलेलं मातीच् मडक् होतं, त्या मडक्यातलं थंड पाणी होतं, मडक्यातून बाहेर पाझरनारं पाझर होतं, शेवटी फूटलेल्या मडक्याच् खापर होतं, माझं प्रेम माती होतं, पण मनापासून केलं होतं...! माझं प्रेम तिच् हस्न बघुन चेहर्यावरच् हसु होतं, तिच्या

प्रेम करावं...!

प्रेमाचं नात अनमोल असावं, प्रेम हे आपलसं असावं, म्हणून आपण प्रेम करावं...! आपण विनोद करावं अन् तिनं हसावं, ती दुखात असेल तर आपण रडावं, तरी आपण प्रेम करावं...! कोणी तरी सोबत असावं, आपल्याला मिठीत घ्यावं, म्हणून आपण प्रेम करावं...! तिनं आपल्या सोबत भांडावं, आपली चूक नसेल तरी आपणच् सॉरी म्हणावं, तरी आपण प्रेम करावं...! दोघांनी मिळून एकच स्वप्न रंगवावं, अन् त्या स्वप्नातल्या घरात आपल्याला राहता यावं, म्हणून आपण प्रेम करावं...! तिचि साथ असावी आपलं नातं टिकावं, पण अस जमवत्तानां कधी आपलच् मोडावं, तरी आपण प्रेम करावं...! तिचा हाथ धरुन गर्दीत चालावं, कोणाचा धक्का लागू नये म्हणून जवळ करावं, तिचि काळजी करता यावी म्हणून आपण प्रेम करावं...! मनातली भावना तिला कधी न् सागांवं, का तर ती आपली होणार नही हे माहीत असावं, तरी आपण प्रेम करावं...! मंदिरात जावं अन् फुल चढवावं, तिला फुलासारखं जप बस् एवढच् मागांवंं, ती आपल्याला मिळावी म्हणून आपण प्रेम करावं...! आपल् स्वप्न एका क्षणात मोडावं, अन् हसर्या चेहर्यान आपण जगा समोर रडावं, तरी आपण प्रेम करावं...! इच्छा असेल कि खरं प्रेम कळावं, तरंच आपण प्रेम करावं...!